पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक १० ते १५ मिनिटे उशीराने

मुंबई लोकल  (संग्रहित छायाचित्र)

ऐन सकाळच्या गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक बुधवारी विस्कळीत झाली. चर्चगेट आणि विरार या दोन्ही दिशेने जाणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे गाड्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त गर्दी असल्याचे पाहायला मिळत आहे.

एएनआयने केलेल्या ट्विटनुसार, गोरेगाव येथे सिग्नल यंत्रणेत सकाळी सात वाजून ०५ मिनिटांनी बिघाड झाला होता. हा बिघाड सकाळी सात वाजून ५० मिनिटांच्या सुमारास दुरुस्त करण्यात आला. पण यामुळे लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. गाड्या वेळेपेक्षा दहा ते १५ मिनिटाने उशीराने धावत आहेत. थोड्याच वेळात गाड्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे धावतील, असे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.