रेल्वे रुळ ओलांडताना सर्वाधिक अपघात होतात. दर महिन्याला कित्येक लोक हे स्वत:च्या चुकीसाठी जीवाला मुकतात. काहींना कायमस्वरूपी अपंगत्त्व येतं. याविषयी जनजागृती करूनही अनेकजण जीव धोक्यात घालून प्राण गमावतात.
आम्ही आमच्या आमदारांना कुठेही हलवले नाही: विजय वडेट्टीवार
लोकांना रेल्वे रुळ ओलांडण्यापासून परावृत्त करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं नवीन मोहीम राबवली आहे. या मोहीमेत खुद्द 'यमराज'ला सामावून घेतलं आहे. यमराज म्हणजे साक्षात मृत्यू, मात्र हेच यमराज रेल्वे रुळ ओलांडणाऱ्याचा जीव घेणार नाही तर वाचवणार आहे.
"यह यमराज रखते हैं नजर और जान बचाते हैं"! पटरी पार करने के खतरों के प्रति लोगों को जागरूक करने के लिए @rpfwrbct द्वारा चलाए जा रहे अभियान के अंतर्गत यात्रियों को पटरी पार करने से रोकने के साथ ही उन्हें पुल/सबवे के उपयोग के लिए प्रेरित किया जा रहा है। pic.twitter.com/WxB7MTnrvc
— Western Railway (@WesternRly) November 7, 2019
पश्चिम रेल्वेच्या मार्गावर यमराजाच्या वेशातील व्यक्ती उभी करण्यात आली आहे. ही व्यक्ती प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडण्यापासून रोखणार आहे. तसेच पूलाचा वापर करण्याबद्दल जनजागृतीही करणार आहे.
मुंबईसह उपनगरात पावसाची विश्रांती; रेल्वे वाहतूक सुरळीत
लोकांमध्ये जगजागृती करण्याचा हा अत्यंत वेगळा मार्ग आहे अशा शब्दात अनेक प्रवाशांनी पश्चिम रेल्वेचं कौतुक केलं आहे.