पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पश्चिम रेल्वेवर लोकलना स्वयंचलित दरवाजे, चाचण्यांना सुरुवात

मुंबई लोकल

मुंबईत पश्चिम रेल्वेकडून लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी ही चाचणी घेण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या या मार्गावरील वातानुकूलित लोकलला स्वयंचलित दरवाजे आहेत.

ठरलं... मध्य रेल्वेची पहिली AC लोकल या मार्गावर धावणार

सध्या एका लोकलच्या तीन डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले आहेत. त्यांची चाचणी बुधवारी नालासोपारा स्थानकावर घेण्यात आली. जर ही चाचणी यशस्वी ठरली तरच पश्चिम रेल्वेकडून पुढील निर्णय घेतला जाईल. 

जस्टिस लोया फाईल पुन्हा ओपन होणार?, गृहमंत्र्यांनी दिले संकेत

पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकलना स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल गाड्यांमध्ये कायम गर्दी असल्याचे दिसते. अनेक प्रवासी दारात उभे राहून प्रवास करीत असतात. त्या पार्श्वभूमीवर लोकलच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येणार आहे. हे दरवाजे रेल्वे स्थानकावर उघडतील आणि बंद होतील, अशी व्यवस्था असणार आहे.