पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

होम क्वारंटाइनचा शिक्का असलेल्या सहा प्रवाशांना सौराष्ट्र एक्स्प्रेसमधून बोरीवली स्थानकात उतरवलं

होम क्वारंटाइन

होम क्वारंटाइनचा शिक्का असलेल्या आणि सिंगापूरवरून परतलेल्या ६ जणांना सौराष्ट्र एक्स्प्रेसमधून उतरवण्यात आलं आहे. हे प्रवासी सिंगापूरमधून परतले होते. त्यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातून एक्स्प्रेस पकडली होती. परदेशातून परतल्यानंतर ज्यांना १०० टक्के घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येत आहे.  

दुबईमधून परतलेल्या गोव्याच्या माजी मंत्र्यांचा विलग होण्यास नकार

त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का असल्याचं आढळून आल्यानंतर त्यांना पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकात उतरवण्यात आलं आहे. ट्रेनमधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का असल्याचं  लक्षात येताच त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना ही माहिती दिली आहे. या रुग्णांची पुन्हा तपासणी सुरु आहे. 

कोरोना इम्पॅक्ट : दोन विमान कंपन्या मोठा निर्णय घेण्याच्या विचारात

 बुधवारी दुपारी पालघर रेल्वे स्थानकात होम क्वारंटाइनचा शिक्का असलेल्या ४ प्रवाशांना उतरवण्यात आलं होतं. हे प्रवाशी गरीबरथ एक्स्प्रेसमधून सुरतला  जात होते. ते वांद्रे टर्मिनन्समध्ये चढले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Western Railway deboarded six passengers from Saurashtra Express on Thursday after noticing home quarantine stamps