पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बापरे, पश्चिम रेल्वेनं आठ महिन्यांत वसूल केला ९३ कोटींचा दंड

पश्चिम रेल्वे

विनातिकिट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून, तसेच रेल्वेचे इतर नियमभंग केलेल्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेनं आठ महिन्यांत ९३. ९६ कोटींचा दंड वसूल केला आहे.  एप्रिल ते नोव्हेंबर या काळात सुरु केलेल्या मोहीमेअर्तंगत विनातिकिट प्रवास करणाऱ्या तसेच इतर १९. १९ लाख प्रकरणात पश्चिम रेल्वेनं दोषींकडून हा दंड वसूल केला आहे. 

कुलाब्यात वेश्या व्यवसायाचा भंडाफोड, तीन तरुणींची सुटका

विशेष म्हणजे  २०१८  मध्ये वसूल करण्यात आलेल्या दंडाच्या तुलनेत ९.४६ % ची वाढ झाली आहे.  १९ लाखांहून अधिक प्रकरणातून  पश्चिम रेल्वेनं हा दंड वसूल केला आहे. मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफ लाइन मानली जाते. या लोकलनं प्रवास करणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे. मात्र त्याचवेळी फुकट्या प्रवाशांचाही सुळसुळाट वाढला आहे. 

धावती रेल्वे थांबविण्यासाठी विनाकारण चेन ओढण्याच्या पुण्यात ८५ घटना

एप्रिल ते नोव्हेंबर या वर्षांत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये ६ लाख ८८ हजार ४९३ प्रकरणंही विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आहेत. तर ४११८ प्रकरणंही अनधिकृत फेरीवाल्यांसदर्भांत आहेत.