पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फोन टॅपिंगच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती, ६ आठवड्यांची मुदत

शरद पवार आणि उद्धव ठाकरे (PTI PHOTO.)

राज्यात गेल्या सरकारच्या काळात विरोधकांचे फोन टॅप करण्यात आले होते का, याचा तपास करण्यासाठी दोन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यातील तत्कालिन विरोधकांचे फोन टॅप करण्यात आले होते, असा आरोप सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतो आहे. भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे आरोप आधीच फेटाळून लावले आहेत.

VIDEO : ... आणि चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरून फरफटत नेले

महाराष्ट्रात गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे फोन टॅप करण्यात आले होते, असा आरोप सध्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही केला होता. गेल्या सरकारमध्ये गृह मंत्रालयाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होती. पण आपण गृह विभागाला अशा स्वरुपाचे कोणतेही आदेश दिलेले नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

हिंगणघाट येथे भरचौकात तरुणीवर पेट्रोल टाकून जाळले

या संदर्भात अनिल देशमुख म्हणाले, आम्ही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती सहा आठवड्यांमध्ये आपले कामकाज पूर्ण करून सविस्तर अहवाल गृह विभागाला सादर करेल. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंग आणि सहआयुक्त (गुप्तचर) अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार म्हणाले, फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करण्यासाठी समिती नेमण्यात यावी, असे पत्र आम्हाला गृहमंत्र्यांकडून मिळाले आहे. सोमवारी सकाळीच हे पत्र आम्हाला मिळाले. आता हे पत्र मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.