पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मास्कशिवाय 'नो एन्ट्री'

मंत्रालय

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. अशात खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयात पुढचे काही महिने मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

कुपवाड्यातील चकमकीत ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ५ जवान शहीद

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र मंत्रालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि अभ्यागतांना मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पुढचे काही महिने मास्कशिवाय कोणालाही मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींचे आवाहन, दिव्यांनी उजळला देश

राज्यात कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात एका दिवसात कोरोनाचे आणखी ११३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ७४८ वर पोहचला आहे. महत्वाचे म्हणजे एकट्या मुंबईमध्ये एका दिवसात १०३ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. महत्वाचे म्हणजे, आतापर्यंत ५६ कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

९ वाजून, ९ मिनिट; पंतप्रधान मोदींनीही प्रज्वलित केले दिवे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:wearing face masks has been made compulsory for all staff officers and visitors to maharashtra mantralaya