पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसचे ठरल्यावरच आमचाही निर्णय - राष्ट्रवादी काँग्रेस

नवाब मलिक

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यामुळे जोपर्यंत काँग्रेस निर्णय घेत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसही आपला निर्णय जाहीर करणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी सांगितले.

भविष्यात काँग्रेसने शिवसेनेशी युती करुन निवडणूक लढवायची का?: निरुपम

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाली. या बैठकीला अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. 

या बैठकीनंतर नवाब मलिक म्हणाले, राज्यातील राजकीय परिस्थितीवर आमची चर्चा झाली. दुपारी चार वाजता आमचे सर्व नेते पुन्हा एकदा भेटणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितपणे निवडणूक लढविली होती. त्यामुळे काँग्रेसने आपला निर्णय जाहीर केला की मगच राष्ट्रवादी काँग्रेस आपला निर्णय जाहीर करेल. पर्यायी सरकार बनवणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. चार वाजता बैठक संपल्यावर पुढे राज्यपालांकडे जाण्यासाठी तीन ते साडेतीन तासांचा वेळ उपलब्ध आहे, असेही सूचक वक्तव्य नवाब मलिक यांनी केले. 

दुपारी ४ नंतर काँग्रेसचा अंतिम निर्णयः मल्लिकार्जुन खर्गे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजपर्यंत सत्ता स्थापनेसंदर्भात आपला दावा सादर करण्याची मुदत दिली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:we will take our decision after congress decision on support to shivsena says ncp nawab malik