पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मूळ सदनिकाधारकांना GST तून वगळण्याचा विषय परिषेदत मांडू - मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार

इमारतींच्या पुनर्बांधणीनंतर मूळ सदनिकाधारकांना मोफत घर बांधून देतांना त्यावर जीएसटी आकारू नये, संबंधित फ्लॅट वगळून उर्वरित विक्री होणाऱ्या फ्लॅटवर जीएसटी आकारला जावा हा विषय येत्या वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत मांडण्यात येईल, असे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
बृहन्मुंबई डेव्हलपर्स असोसिएशनने सुधीर मुनगंटीवार यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रपतींच्या विमानाला ३ तास उशीर झाल्यावर सविस्तर चौकशीचे आदेश

हा विषय इतर राज्यांसाठी नसला तरी महाराष्ट्रासाठी आणि विशेषत: मुंबईसाठी महत्वाचा आहे. मुंबईत एसआरए, म्हाडा, सेस आणि इतर इमारतींच्या रिडेव्हलपमेंटचा प्रश्न मोठा आहे. या कामाला गती मिळावी यादृष्टीने ज्या इमारतींचे रिडेव्हलपमेंट होत आहे. तेथील मूळ सदनिकाधारकांना पूनर्बांधणीनंतर नवीन घर मोफत देताना त्यावर जीएसटी आकारू नये, पुनर्बांधणीत मूळ सदनिकाधारकांचे फ्लॅट मोफत देऊन झाल्यानंतर जे फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध राहतील. त्या उर्वरित नव्या फ्लॅटच्या विक्रीवर जीएसटी आकारावा ही मागणी आपण वस्तू आणि सेवा कर परिषदेमध्ये मांडू, असे मुनगंटीवार म्हणाले.

FIFA U 17 : महिला विश्वचषक स्पर्धेचा मुहूर्त ठरला!

इमारतीच्या रिडेव्हलपमेंटनंतर मोफत घर बांधून दिल्यानंतरही त्या घरावर जीएसटी आकारला जात असल्याने इमारतींच्या पुनर्विकासाची कामे खोळंबली असल्याचे मत बिल्डर असोसिएशनच्या वतीने बैठकीत व्यक्त करण्यात आले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:We will raise issue of gst charged to flat owners in redevelopment projects says sudhir mungantiwar