पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देवेंद्र फडणवीस होते म्हणूनच मी गेल्यावेळी पाठिंबा दिला होता - उद्धव ठाकरे

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे अन्य नेते

महाराष्ट्रात २०१४ मध्ये सत्ता स्थापनेवेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते म्हणूनच मी त्यावेळी पाठिंबा दिला होता, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शु्क्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस नसते तर कदाचित मी पाठिंबा दिलाही नसता, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुपारी राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्तावाटपात मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे वाटून घेण्याबद्दल काहीही ठरले नव्हते, असे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली.

उद्धवजींनी माझे फोन उचलले नाहीत, फडणवीसांचा आरोप

उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे मी त्यांना पाठिंबा दिला होता. दुसरे कोणी असते तर मी कदाचित पाठिंबा दिलाही नसता. आजची फडणवीस यांची पत्रकार परिषद पाहून काळजी वाटते. ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:We supported last bjp government because devendra fadnavis was chief minister says uddhav thackeray