पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संजय राऊत म्हणतात, देवेंद्र फडणवीस यांच्याशी भांडण नाही पण...

संजय राऊत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचे कोणतेही भांडण नाही. पण राज्यात सध्या जे काही सुरू आहे ते सत्यासाठीचे भांडण आहे. सत्य आणि असत्यातील लढाई आहे. शिवसेना कायम सत्याच्याच बाजूने उभी राहिली असल्याचे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी सांगितले. त्याचबरोबर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'महाराष्ट्रासाठी आता एकच गोड बातमी, शिवसेनेचा मुख्यमंत्री'

संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले...

१. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही.

२. ज्यांच्याकडे बहुमताचा १४५ हा आकडा आहे. त्यांनी सरकार बनवावे. आम्ही सध्या फक्त शांतपणे काय काय घडते आहे ते बघतो आहोत.

३. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचे कोणतेही भांडण नाही. सध्या केवळ सत्य विरुद्ध असत्य अशी लढाई सुरू आहे.

४. एक दिवस भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे स्वतःच गोड बातमी घेऊन येतील आणि सांगतील की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होतो आहे.

काँग्रेसचे बहुतांश आमदार शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या बाजूने

५. शिवसेनेच्या आमदारांशी घोडेबाजारासाठी संपर्क करण्याची कोणाची हिम्मत नाही. पण इतर पक्षांच्या नेत्यांकडून आम्हाला कळते आहे की त्यांच्या आमदारांशी संपर्क करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ज्यांच्या हातात सत्ता, यंत्रणा आणि पैसा असतो तेच असे हातखंडे वापरत असतात.

६. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असे काँग्रेसचे आमदार म्हणत असल्याचे मी ऐकले आहे. राज्यातील जनतेचीही तीच इच्छा आहे.