पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि राहणारचः CM ठाकरे

उद्धव ठाकरे (PTI file photo)

हे सरकारच अनैतिक आहे अशी टीका भाजपकडून केली जाते. पण नैतिकतेच्या गोष्टी कोणी कोणाला शिकवायच्या, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मोदींवर टीका करणारेसुद्धा त्यांना नंतर प्रिय होतात. त्यांच्या वॉर्डात जाऊन मोदी प्रचार करतात, ही नैतिकता? रामविलास पासवान त्यांच्याबद्दल काय बोलले होते? नितीशकुमार काय बोलले होते? आता बिहारमध्येच त्यांची आपापसात लागलीय, तरी ते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नैतिकता शिकवू नका. यांच्याकडून राज्याला आणि देशाला नैतिकता शिकण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला. राज्यसभा सदस्य तथा शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'चे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यात ते बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केल्यामुळे शिवसेनेने हिंदुत्ववादाचा त्यागा केल्याची टीका केली जात होती. उद्धव ठाकरे यांचे या टीकेला हे उत्तर मानले जाते.

तिन्ही पक्षाच्या विचारधारेबाबत प्रश्न उपस्थित केला जातो. यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, यात दोन भिन्न विचारधारा, तीन भिन्न विचारधारा तुम्ही म्हणताय; पण केंद्रात जे सरकार आहे त्यात आता किती पक्ष आहेत? त्यांचे किती विचार आहेत? नितीशकुमार आणि भाजपची विचारधारा एक आहे का? मेहबुबा मुफ्ती आणि त्यांची विचारधारा एक होती का? चंद्राबाबूंची एक होती का? ममता बॅनर्जी त्यावेळी सत्तेत होत्या त्यांची विचारधारा एक होती का? जॉर्ज फर्नांडिस यांची विचारधारा एक होती का? रामविलास पासवान आज त्यांच्यासोबत आहेत. त्यांची आणि भाजपची विचारधारा एक आहे का? आता झारखंडमध्ये काय घडलं? तिथं विचारधारा जुळली का? सगळं कसं आहे, झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणायचं. आपण घरात गंगाजल आणून ठेवतो तसाच हा प्रकार आहे.

...तर आज मी मुख्यमंत्री नसतोः उद्धव ठाकरे

आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि राहणारच. काँगेसची विचारधारा वेगळी आहे, पण दोन्ही, तिन्ही पक्ष किंबहुना या देशात जेवढे पक्ष आहेत त्यांचे उदाहरण घ्या. आपापल्या राज्याचं हित, देशाचं हित या विचारापेक्षा कोणी भिन्न आहे का? आम्हाला राज्याचं हित करायचं नाहीय का? देशाचं हित करायचं नाही का? देशात, राज्यात अराजक माजवायचंय का? आणि तरीही आम्ही तुमच्यासोबत येतोय असं म्हणून कोणी एकत्र आलेले नाहीये. 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारासाठी रुग्णालयात

पक्ष फोडून आणलेली माणसं तुम्हाला चालतात. मग त्या पक्षासोबतच हात मिळवला तर काय फरक पडतो? त्या पक्षातले मोठमोठे नेते घेऊन भारतीय जनता पक्षातसुद्धा त्यांना सामावून घेतलंच आहे ना. कित्येक नेते काँग्रेसमधून त्यांनी घेतलेत. त्यांना आमदारक्या, खासदारक्या किंवा इतर काही गोष्टीसुद्धा दिल्या आहेत. तेसुद्धा त्या विचारधारेवरच होते ना?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

स्कुटीवरुन आलेल्या हल्लेखोरांचा जामियाच्या प्रवेशद्वारावर गोळीबार