पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे वांद्रे, धारावीत शनिवारी पाणीपुरवठा बंद

प्रातिनिधिक छायाचित्र

धारावी येथे  अप्‍पर वैतरणा जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेतल्यानं १८ ते १९ जानेवारी या दोन दिवशी वांद्रे आणि धारावी येथील काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे. वांद्रे येथे २४ तास, तर धारावीत अंशत: पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. 

मुंबईत जानेवारीत सर्वाधिक थंडी, दशकातील नवा विक्रम

१८ जानेवारीला दुपारी १२ वाजल्यापासून १९ जानेवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे वांद्रे आणि धारावीतील रहिवाशांना पाण्याचा तुटवडा जाणवेल. यासाठी आज पाण्याचा मुबलक साठा करून ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.  धारावी मेन रोड, कुंभारवाडा, ए. के. जी. नगर रोड,  संत गोरा कुंभार रोड,  गणेश मंदिर रोड आणि  दिलीप कदम मार्गावर १८ जानेवारीला सायंकाळी ४ ते रात्री ९ पर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे. 

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला दोषी जलीस अन्सारी बेपत्ता

१९ जानेवारी सकाळी  ४ ते दुपारी १२  यावेळेत माटुंगा लेबर कॅम्प, प्रेम नगर, एम. जी. रोड, धारावी लूप रोड,  नाईक नगर, ६० फूट रोड, जस्मिन मिल रोड,  ९० फूट रोड, एम. जी. रोड, धारावी लूप रोड, संत रोहिदास मार्गावर पाणीपुरवाठा बंद असणार आहे. वांद्रे टर्मिनस परिसरात २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद असणार आहे.