पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चांदिवलीमध्ये सुरक्षा भिंत कोसळली; एकाचा मृत्यू 2 जण गंभीर जखमी

चांदिवलीत सुरक्षा भिंत कोसळली

मालाड येथे सुरक्षा भिंत कोसळून 29 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना मुंबईमध्ये आणखी एका ठिकाणी भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. चांदिवली येथे सुरक्षा भिंत कोसळून एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. चांदिवलीच्या म्हाडा कॉलनी येथे ही घटना घडली आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

मुंबईतील बेस्टच्या डेपोंमध्ये भूमिगत पार्किंग सुविधा? नवा प्रस्ताव

मुंबईसह उपनगरामध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे चांदिवलीमध्ये भिंत कोसळली. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास म्हाडा कॉलनीतील सुरक्षा भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. ढिगाऱ्याखालून तीन जणांना गंभीर जखमी अवस्थेमध्ये बाहेर काढण्यात आले. त्यांना ताबडतोबत नजीकच्या रुग्णलयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र यामधील एकाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

VIDEO : धक्कादायक!, वडोदरामध्ये साचलेल्या पाण्यात आली मगर

VIDEO : धक्कादायक!, वडोदरामध्ये साचलेल्या पाण्यात आली मगर