पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तरुणाला मारहाण करुन मुंडण करणाऱ्या ४ शिवसैनिकांना अटक

हिरामणी तिवारी (ANI)

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या वडाळा येथील तरुणाला शिवसैनिकांनी मारहाण करत त्याचे मुंडन केले होते. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या ४ शिवसैनिकांना अखेर अटक करण्यात आली आहे. या शिवसैनिकांविरोधात विरोधात वडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

तरुणाला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी समाधान जुगदार, प्रकाश हंसबे, सत्यवान, श्रीकांत यादव यांच्याविरोधात वडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १४३, १४७, १४९, ३२३, ३२५, ३४२, ५०४, ५०६, ५९६ (२) अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाला मारहाण करणाऱ्या शिवसैनकांविरोधात कारवाई करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपने केली होती. अखेर या शिवसैनकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. 

...म्हणून सरकार चालवण्यासाठी कसरत करावी लागते: फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जामिया प्रकरणाची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरुन वडाळा येथे राहणाऱ्या हिरामणी तिवारी या तरुणाने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती  यावरुन संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्याला भरचौकात मारहाण करत त्याचे मुंडन केले होते. किरीट सोमय्या यांनी हिरामणी तिवारी याच्या कुटुंबीयांना भेट घेतली होती. तसेच त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी केली होती.