पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाड्यामध्ये एसटी बसला अपघात; ५० प्रवासी जखमी

वाडा एसटी अपघात

पालघर जिल्ह्यातल्या वाडा येथे एसटीला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये विद्यार्थ्यांसह ५० प्रवासी जखमी झाले आहेत. या मधील ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. वाडा आगाराची एसटी पिवळी ते वाडा दरम्यान धावत होती. या एसटीला आज सकाळी सातच्या सुमारास अपघात झाला. एसटी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे.

भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस प.बंगालमध्ये ममता बॅनर्जींशी करणार 'समजोता

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेसहा वाजता पिवळीवरून वाड्याकडे एसटी बस निघाली होती. या बसमध्ये वाडा येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि काही कामगार असे एकूण ६० जण प्रवास करत होते. भरधाव वेगात असलेल्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि जांभूळपाडाजवळ बस झाडाला धडकली. या अपघातामध्ये ५० जण जखमी झाले. यामध्ये १४ लहान विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामधील ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोन गंभीर जखमी कामागारांना ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

'..तर १०० व्या स्वातंत्र्यदिनी काश्मीर भारताचा भाग नसेल'

या अपघातामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाला, डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाली आहे. बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. दरम्यान, एस टी महामंडळाकडून तसेच पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. सध्या जखमी प्रवाशांसाठी महामंडळाकडून प्रत्येकी १ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.

इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड; नितीन गडकरी करत होते प्रवास