पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील मतदान आणि मतमोजणी यांच्या आकडेवारीत फरक - प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही गुरुवारी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर शंका व्यक्त केली. महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघात प्रत्यक्षात झालेले मतदान आणि ईव्हीएमच्या माध्यमातून मोजले गेलेले मतदान याच्या आकड्यांमध्ये फरक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आलेल्या सरकारबद्दल आमच्या मनात साशंकता आहे. 

मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी ईव्हीएमचा मुद्दा लावला. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ईव्हीएम पूर्णपणे विश्वासार्ह नसल्याचे मत मांडले होते. त्यामुळे राज्यात आता ईव्हीएमविरोधातील भावना अधिक बळकट होऊ लागल्याचे दिसते आहे. या संदर्भात आपण राज्यातील ४८ मतदारसंघातील न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

'..तर मी काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळण्यास तयार'

राज्यातील एकूण २२ लोकसभा मतदारसंघात प्रत्यक्ष मोजले गेलेले मतदान हे तिथे झालेल्या मतदानापेक्षा जास्त आहे. हा फरक ८ पासून १३८० मतांपर्यंत आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीच्या आधारे त्यांनी हे वक्तव्य केल्याचे सांगितले. तर २६ मतदारसंघात ईव्हीएमच्या माध्यमातून मोजले गेलेले मतदान हे प्रत्यक्षात झालेल्या मतदानापेक्षा कमी आहे. हा फरक १६ पासून २१०१ मतांपर्यंत आहे, असे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये हा फरक १२०७ मतांचा आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतील एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी ठरले आहेत. या सर्वातून हेच सिद्ध होते की ईव्हीएम हे पूर्णपणे विश्वासार्ह नाहीत. त्यामध्ये फेरफार केला जाऊ शकतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री फोन करुन काँग्रेस कार्यकर्त्यांना फोडताहेतः चव्हाण

निवडणूक आयोगाने याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी. त्याचबरोबर केंद्र सरकारने त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करू नये, अशी मागणी त्यांनी केली. देशात पुन्हा एकदा मतपत्रिकांच्या साह्याने निवडणुका घेतल्या जाव्यात. अनेक लोकशाही देशांमध्ये याच पद्धतीने निवडणुका घेतल्या जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.