पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाविरोधातील लढाईसाठी विवा कॉलेजचा पुढाकार, अशी करणार मदत

इटलीतील एका दाम्पत्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणूने देशभरात थैमान घातले आहे. मुंबईच्या वसई-विरार भागात देखील या विषाणूचे रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. अशामध्ये विरारमधील विष्णु वामन ठाकूर धर्मादाय संस्था मदतीसाठी पुढे सरसावली आहे. ही संस्था विरारमधील विवा महाविद्यालयाच्या दोन इमारतींसह शिरगाव येथील संस्थेच्या महाविद्यालयाच्या इमारतीही वैद्यकीय कारणासाठी विनामूल्य उपलब्ध करुन देणार आहे. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ४९० वर; ५० रुग्णांना डिस्चार्ज

विष्णु वामन ठाकूर धर्मादाय संस्थचे अध्यक्ष आणि स्थानिक आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र दिले आहे. विरार येथील विवा महाविद्यालयात ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. महाविद्यालयाचा विस्तार खूपच मोठा आहे. सध्या कोरोनाचे थैमान आवरण्यासाठी वैद्यकीय सुविधांची वानवा असल्याचे समोर येत आहे. नेमका हाच विचार करून विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने आपल्या महाविद्यालयाच्या इमारती वैद्यकीय वापरासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्मचारी संघटनेचा भत्ता कपातीला विरोध, दिला मोदींच्या भाषणाचा दाखला

लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे महाविद्यालये बंदच आहेत. त्यामुळे विरारमधील दोन आणि शिरगावमधील महाविद्यालयाच्या इमारती रिकाम्या आहेत. वैद्यकीय कारणासाठी ही वास्तू सत्कारणी लागणार असेल, तर त्याचे सर्वात जास्त समाधान आम्हाला वाटेल. नेमक्या याच उद्देशाने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्याचे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. 

निजामुद्दीन मरकज: ९६० परदेशी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सध्या आरोग्यसुविधांबरोबरच अन्नधान्याची सोय हा मुद्दादेखील महत्त्वाचा ठरत आहे. याचाच विचार करून श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट, साईबाबा मंदिर ट्रस्ट, यंग स्टार ट्रस्ट, वि. वा. ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अशा काही संस्था आणि समाजातील दानशूर लोक यांनी एकत्र येत जवळपास १५ हजार लोकांच्या जेवणाची मोफत सोय केली आहे. महाविद्यालयाच्या इमारतींमध्ये वैद्यकीय सेवा सुरू केल्यास तेथील रुग्णालय कर्मचारी, रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्या जेवणा-खाण्याची सोयही विनामूल्य केली जाईल, असंही ठाकूर यांनी सांगितले. 

लॉकडाऊनः या कंपनीची मोठी घोषणा, २६ शहरांमध्ये देणार १० हजार रोजगार