पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चेंबूरमधील अंत्ययात्रेत हिंसाचार: २०० जणांवर गुन्हा ३३ जण अटकेत

चेंबूरमध्ये हिंसाचाराची घटना घडली होती.

मुलगी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी दुर्लक्ष केल्याच्या कारणावरुन संतापलेल्या पित्याने आत्महत्या केल्याची घटना मुंबईतील चेंबूर येथे घडली होती. या घटनेनंतर मृत इसमाच्या अंत्ययात्रेदरम्यान संतप्त जमावाने चेंबूर येथील सायन-पनवेल महामार्गावर रास्तारोको करुन दगडफेक करत संताप व्यक्त केला. यावेळी जमावाने बंदोबस्ताला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही मारहाण केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणात पोलिसांनी २०० जणांवर गुन्हा दाखल केला असून ३३ जणांना अटक केली आहे.

चेंबूरमध्ये अंत्ययात्रेवेळी जमाव संतप्त; तुफान दगडफेक

१७ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. या व्यक्तीच्या अंत्ययात्रेवेळी हा सर्व प्रकार घडला होता.
एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी घडलेल्या हिंसाचारामध्ये ७ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. मागील आठवड्यात पंचाराम रिठाडिया (४४) या व्यक्तिने तिलक नगर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली होती. काही महिन्यापासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षांच्या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची मदत होत नाही, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे सुसाइड नोट मृत इसमाने लिहिली होती.

मंकी हिल-कर्जत दरम्यान १० दिवसांचा ब्लॉक; प्रगती एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द

मंगळवारी मृत रिठाडिया याच्या अत्यंयात्रेच्या दरम्यान संताप व्यक्त करण्यासाठी काहींनी पोलिसांवर दगडफेक केली. एवढेच नाही तर पोलीस वाहनासह अन्य वाहनांची आणि दुकानांची देखील तोडफोड करण्यात आली. यात चार पोलीस अधिकाऱ्यांसह ७ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्री उशाराने जवळपास २०० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. बुधवारी यातील ३३ जणांना अटक करण्यात आली. या हिंसाचाराच्या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शोध घेण्यात येत आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: violence took place at chembur in mumbai during a funeral procession many people booked and arrested