पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विनायक राऊत लोकसभेच्या शिवसेना गटनेतेपदी

विनायक राऊत

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांची लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे. विनायक राऊत हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहे. 

लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांचा तब्बल १ लाख ७८ हजार ३२२ मतांनी पराभव केला होता. लोकसभेची त्यांची ही दुसरी वेळ होती. गत निवडणुकीतही (२०१४) त्यांनी निलेश राणे यांचा पराभव केला होता. 

यापूर्वी ते १९९९-२००४ या काळात विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. २०१२ मध्ये ते विधान परिषदेवरही गेले होते. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर विधान परिषदेचा राजीनामा दिला होता. 

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला!

नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली होती. त्यांनी २३ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यापैकी १८ जागांवर विजय मिळवला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Vinayak Bhaurao Raut has been appointed as the group leader of Shiv Sena Parliamentary Party in Lok Sabha