पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वांद्रे गर्दी प्रकरण: उत्तर भारतीय महापंचायतीचा अध्यक्ष विनय दुबेला अटक

मुंबई पोलिसांनी विनय दुबेला केली अटक

वांद्रे गर्दी प्रकरणी पोलिसांनी उत्तर भारतीय महापंचायतीचा अध्यक्ष विनय दुबेला अटक केली आहे. मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी १८ एप्रिलपर्यंत रेल्वेची सोय करुन दिली नाही तर देशव्यापी आंदोलनाचा इशारा विनय दुबेने दिला होता. मुंबई पोलिसांनी आंदोलनाचा इशारा आणि अफवा पसरवल्याप्रकरणी विनय दुबे याला मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. 

विनय दुबेला पोलिसांनी नवी मुंबईतील ऐरोली येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. अफवा पसरवणे, संचारबंदीचे उल्लंघन करणे, नागरिकांना एकत्र जमवणे याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विनय दुबेला आज स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी सकाळी लॉकडाऊनमध्ये ३ मेपर्यंत वाढ केल्याची घोषणा केली. १९ दिवसांनी लॉकडाऊन वाढवण्यात आला असताना सुद्धा वांद्रे स्टेशनवर आपल्या गावाकडे जाण्यासाठी उत्तर भारतीय मजुरांनी मोठी गर्दी केली होती. लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करत या लोकांनी आपापल्या घरी जाण्याची मागणी केली. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. दरम्यान, वांद्रे गर्दी प्रकरणी राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:vinay dubey arrested by mumbai police for threatening a huge protest by migrant labourers in kurla