पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती

विकास खारगे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी सोमवारी कार्यभार स्वीकारला. १९९४ च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेले विकास खारगे हे सध्या वन विभागाचे प्रधान सचिव होते. भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी त्यांच्या बॅचमध्ये देशात ३४ वा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळविला होता. २०१४ मध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांचे सचिव म्हणून देखील काम पाहिले होते.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर

मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचे असलेले विकास खारगे यांचा जन्म १७ मार्च १९६८ चा असून त्यांचे शालेय शिक्षण इचलकरंजीच्या शाहू नगरपरिषदेच्या शाळेत तसेच व्यंकटराव माध्यमिक शाळेत तसेच कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये झाले. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकीमधून त्यांनी बी.ई (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन) ही पदवी संपादन केली. तसेच युकेच्या युनिर्व्हसिटी ऑफ ससेक्समधून एम.ए. (गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट) पूर्ण केले. 

प्रशासनाचा गाढा अनुभव
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सहायक जिल्हाधिकारी, नागपूर आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच यवतमाळ आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले केली. मुंबई येथे विक्रीकर सहआयुक्त, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव, भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्थेचे संचालक, कुटुंब कल्याण आयुक्त, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचे संचालक, राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, बृहन्मुंबईचे अतिरिक्त आयुक्त तसेच वन विभागाचे सचिव अशा महत्त्वाच्या पदांवर ते कार्यरत होते.

बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर;चंद्रकांत पाटील म्हणाले,त्या आजारी आहेत

अनेक पुरस्कार
विकास खारगे यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना नुकताच नववा अर्थ केअर अवॉर्ड मिळाला आहे. याशिवाय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे कार्यालय राज्यातील पहिले पेपरलेस ई-ऑफिस केल्याबद्दल राजीव गांधी प्रशासकीय सुधारणा पुरस्कार, औरंगाबाद जिल्ह्यात धार्मिक सलोखा राखल्याबद्दल महात्मा गांधी शांतता पुरस्कार, त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यात साक्षरता कार्यक्रम प्रभावीरित्या राबविल्याबद्दल तत्कालीन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सत्येन मित्रा राष्ट्रीय पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Vikas Kharge is new principal secretary to chief minister of maharashtra uddhav thackeray