पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वंचित आघाडी विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवणारः प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी (व्हीबीए) आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. आंबेडकर यांनी विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. एमआयएम आणि जनता दल (से) यांच्याशी आघाडी करुन निवडणूक लढवणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात तिरंगी लढती झाल्यास विरोधकांच्या मतात विभागणी अटळ असून याचा फायदा सत्ताधारी भाजप-शिवसेनेला होऊ शकतो. 

पंतप्रधानपदासाठी पवारांना विरोध, मायावतींना पाठिंबा- प्रकाश आंबेडकर

नुकताच राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने सर्व ४८ जागा लढवल्या होत्या. वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता वंचितने विधानसभेची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

वंचितने २८८ जागांसाठी तयारी सुरु केली आहे. उमेदवारांची निवड प्रक्रियाही सुरु केल्याचे आंबेडकर यांनी 'हिंदूस्थान टाइम्स'शी बोलताना सांगितले. 

'नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी पुढचे पंतप्रधान असणार नाहीत'

भाजपविरोधी मतांमध्ये फूट टाळण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न सुरु केले होते. पण ही आघाडी होऊ शकली नाही. आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी दोघांनीही आघाडी न होण्यामागे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. मात्र, विधानसभा निवडणुका दोघांसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून भाजप-शिवसेना सरकारचे अपयश समोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला गड राखण्याचा प्रयत्न करत आहेत.

'आम्ही कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करणार नाही. जर काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडी करावी असे वाटत असेल तर त्यांचे स्वागत आहे. पण ही आघाडी आमच्या अटींवर होईल,' असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. वंचित आघाडी-एमआयएम-जेडीएस यांची आघाडी भाजप-शिवसेना युतीला आव्हान देण्यास सक्षम असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

सरपंचासारखं वागणाऱ्याला पंतप्रधान करणार का? आंबेडकरांची मोदींवर टीका

दरम्यान, भाजप-शिवसेनेला मदत करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी मोदींनी मदत करण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यात यशस्वी झाले नाहीत. त्यामुळेच ते सध्या अशा क्लृप्त्या लढवत आहेत, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.