कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशात लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. जीवनावश्यक सेवा आणि कृषीविषयक वस्तू वगळता सर्व गोष्टींवर १४ एप्रिलपर्यंत निर्बंध घालण्या आले आहेत. संयम आणि दृढ संकल्पाने जागतिक संकटाला परतवून लावण्यासाठी खटोटोप सुरु असताना काही तळीराम मद्य (दारु) खरेदीसाठी धडपडताना दिसत आहेत.
कोविड-१९ : इस्त्रायल पंतप्रधानांची PM मोदींकडे सहकार्याची विनंती
लॉकडाऊनच्या काळात मद्य विक्रीचा प्रकार वाशी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, नवी मुंबईतील संजोग बार आणि रेस्टोरंटमध्ये मद्य विक्रीचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. वाशी पोलिसांनी चोरुन मद्य विक्री करणाऱ्या मॅनेजरसह एका वेटला अटक केली असून पोलिसांनी बार सील केले आहे. पोलिसांनी याठिकाणाहून जवळपास १ लाख ३० हजार रुपयांची दारु जप्त केली आहे.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ४९० वर; ५० रुग्णांना डिस्चार्ज
राज्यातील वेगवेगळ्या भागात केंद्र आणि राज्य सरकारचा आदेश झुकारुन मद्य विक्री होत असल्या्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दारुची दुकाने तोडून मद्य चोरी केल्याच्या काही घटनाही समोर आल्याचे पाहायला मिळाले होते. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारावई करण्याचे आदेश दिले असताना कोणत्या ना कोणत्या भागात अशा प्रकारच्या घटना उघडकीस येत आहेत.