पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना : वसई-विरार रेल्वे स्थानकांत खबरदारी घेत निर्जंतुकीकरण

वसई

पश्चिम रेल्वे मार्गावरील  सर्वांत गर्दीची स्थानकं वसई-विरार निर्जंतुकीकरण करण्यासाठी वसई-विरार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. कोरोना विषाणूनं वसई विरार महापालिकेच्या हद्दीत रेल्वे मार्गाने शिरकाव करू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत.  पालिकेच्या 'नो कोरोना' मोहिमेअंतर्गत रेल्वे स्थानकांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. सायंकाळी मुंबईत कामानिमित्त गेलेले शहरातील लोक घरी परतत असतात.  त्यामुळे मुंबईतून कोरोनाचा विषाणू शहरात येऊ शकतो हे लक्षात घेऊन ही उपाययोजना करण्यात येत आहे. 

आज मध्यरात्रीपासून राज्यात जमावबंदी लागू : उद्धव ठाकरे

वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत असलेली वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव ही चार प्रमुख स्थानकं आहेत. या स्थानकांमधून दर दिवशी लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यातच वसई येथे लांब पल्ल्याच्या गाड्याही थांबत असल्याने विषाणू संसर्ग होण्याची  शक्यता जास्त आहे. यावर रेल्वे स्थानकांवरील गर्दी लक्षात घेऊनच वसई-विरार महापालिकेने रेल्वेकडे या स्थानकांचे निर्जंतुकीकरण करण्याची परवानगी मागितली होती. रेल्वेनेही ही परवानगी देत सहकार्य केले. पालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसह बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मदतीला घेत या चारही स्थानकांमधील प्रत्येकी चार अशा १६ प्लॅटफॉर्मच्या निर्जंतुकीकरणाचं काम हाती घेत ते पूर्ण केले आहे. स्थानकांमधील प्लॅटफॉर्मप्रमाणेच स्वच्छतागृहे, तिकीट खिडक्या, प्रतीक्षालये, पादचारी पूल येथेही निर्जंतुक रसायन फवारण्यात आले आहे. 

मुंबईकरांची 'लाइफ लाइन' ३१ मार्चपर्यंत बंद, प.रे. आणि म.रे.चा निर्णय

''मुंबई आणि आसपासच्या परिसरात रेल्वे हे मुख्य वाहतुकीचे साधन आहे. त्याचप्रमाणे संसर्गजन्य आजार सर्वदूर पसरवण्यातही रेल्वेचा हातभार मोठा असतो. नेमक्या याच गोष्टी लक्षात घेत स्थानकांचे निर्जंतुकीकरण करण्याची गरज आम्हाला लक्षात आली. आम्ही पालिकेतील अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनाही ही गोष्ट पटली. त्यातूनच हा उपक्रम राबवण्यात आला'', असं स्थानिक आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:vasai virar municipal corporation Employees Sensitized railway platfrom to secure from coronavirus