पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत वाहतूक कोंडीत अडकले केंद्रीय मंत्री, रिक्षात केला प्रवास

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो

केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी टि्वटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात ते मुंबईत रिक्षात प्रवास करताना दिसत आहेत. वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांनी आपली कार सोडून रिक्षा केली.

टि्वटरवर १७ सप्टेंबरला शेअर केलेल्या या व्हिडिओत सुप्रियो यांनी म्हटले की, त्यांची कार वाहतूक कोंडीत अडकली आहे. या संधीचा उपयोग करत मी रिक्षात पुढील प्रवास करत आहे.

लिव-इनपेक्षा विवाहित महिला अधिक आनंदीः RSS

माझी सरकारी कार अडकली आहे. या संधीचा वापर मी रिक्षात बसण्यासाठी करत आहे. यामुळे मला माझे जुने दिवस आठवत आहेत. या शहरात मी रिक्षाने प्रवास करत संघर्ष केला आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मला खूप चांगलं वाटत आहे, असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

त्यांनी म्हटले की, मी पहिल्यांदा १९९२ मध्ये रिक्षात बसलो होतो आणि आता मी या प्रवासाचा आनंद घेत आहे. माझ्या मनात आता किशोरकुमार यांचे 'मैं हूं घोड़ा, ये है गाड़ी, मेरी रिक्शा सबसे निराली' गाणं येत आहे. त्यांनी हे गाणे गुणगुणलेही.

'चांद्रयान-२' च्या ९८ % यशानंतर इस्रोने हाती घेतलीय 'ही' मोहीम

पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्री असलेल्या सुप्रियोंनी हा एक अद्भुत अनुभव असल्याचे सांगत मुंबईत कमालीच्या रिक्षा आहेत, असे म्हटले.