पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२६ सप्टेंबरला अमित शहा मुंबई दौऱ्यावर; युतीचा तिढा सोडवणार?

अमित शहा

विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली तरी देखील भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीचा तिढा अजूनही सुटला नाही. जागावाटपा बाबत दोन्ही पक्षांमध्ये वारंवार चर्चा सुरु आहे. मात्र जागांबाबतचा निर्णय अद्याप झाला नाही. दरम्यान, एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या २६ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे तेच युतीचा तिढा सोडवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दहशतवादाविरोधात ट्रम्प आमच्यासोबत, मोदींचा पाकला सूचक इशारा

युतीबाबत गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहेत. यासाठी बैठकांवर बैठका सुरु आहेत. मात्र जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झाला नाही. शिवसेनेने १३० जागांची मागणी केली आहे. त्यापैकी ११८ जागांबाबत भाजपने निश्चिती दर्शवली आहे. त्यामुळे या जागांचा तिढा सुटला आहे. तर उर्वरित १२ जागांबाबत अद्याप दोन्ही पक्षांमध्ये खल सुरु आहे. यामधील काही जागा शिवसेनेला हव्या आहेत. तर भाजप या जागा सोडण्यात तयार नाही. 

हे वागणं बरं नव्हं! शरद पवारांचा उदयनराजेंना अप्रत्यक्षपणे टोला

दरम्यान, दोन्ही पक्षातील युतीबाबतचा हा तिढा सुटण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे येत्या २६ सप्टेंबरला अमित शहा मुंबई दौरा करणार आहे. त्याच दरम्यान हा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील दोन दिवसांत युतीबाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये पुन्हा चर्चा होईल. त्यानंतर अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अंतिम निर्णय काय होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जागतिक कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या ढाण्या वाघानं रचला इतिहास