अभिनेत्री गायत्री जोशी ऑबेरॉयच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरून तब्बल ४० हजार लुटले असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीच्या वतीनं जुहू पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. कार्ड क्लोन करून त्याचा गैरवापर करण्यात आल्याची शंका पोलिसांना आहे.
अभिनेत्री ईशा गुप्ताविरोधात व्यावसायिकाची बदनामीची तक्रार
१६ जुलैला गायत्री घराबाहेर होत्या. तेव्हा खात्यातून ४० हजार गेले असल्याचा मेसेज त्यांना आला. याबद्दल त्यांनी आपल्या साहाय्यकाला फोन करून विचारले मात्र गायत्री यांचे क्रेडिट कार्ड नेहमीच्याच जागेवर होते अशी माहिती साहय्यकानं त्यांना दिली.त्यानंतर गायत्रीच्या वतीनं त्यांच्या साहाय्यकानानं जुहू पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. गायत्री यांच्या कार्डची माहिती चोरून कार्ड क्लोन करून त्याद्वारे पैसे काढले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
मुंबईतील सोसायट्यांमध्ये लवकरच सार्वजनिक पार्किंगची शक्यता
यापूर्वी जुलै महिन्याच्या सुरूवातीला अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरून त्याआधारे त्यांच्या कार्डच्या साह्याने १२ हजार रुपये चोरट्यांनी लुटल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे चोरट्यांनी युरो चलनामध्ये व्यवहार केले होते. ५ जुलैला हा प्रकार घडला होता.