पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CSMT ते ठाणे मार्गावर लवकरच भूमिगत लोकलची शक्यता

मुंबई लोकल

मध्य रेल्वेच्या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या स्थानकांदरम्यान भूमिगत लोकलचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मंगळवारी या संदर्भातील प्रस्ताव ठेवला. एकूण ३३.८ किलोमीटरच्या या मार्गावर भूमिगत रेल्वे साकारल्यास २१ मिनिटांमध्ये शिवाजी महाराज टर्मिनसहून ठाण्याला जाणे शक्य होऊ शकेल. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या (MUTP) चौथ्या टप्प्यातील कामांचाच हा एक भाग असणार आहे. रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार एकत्रित मिळून हे काम करणार आहेत.

भीमा-कोरेगाव हिंसाचार : गौतम नवलाखा यांचे 'हिज्बुल'शी संबंध - पोलिस

भूमिगत मार्गावर मेट्रोसारख्याच नऊ डब्यांच्या लोकल असतील. यासाठी अंदाजे १५,५०६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पण जमीन अधिग्रहण वगैरेचा विचार करता या खर्चात १७,९६२ कोटी रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने या मार्गावर भूमिगत लोकलसेवा सुरू करता येईल का, याची चाचपणी केली असून, त्याचा अहवाल मुंबई रेल्वे विकास महामंडळाला याच महिन्यात सादर केला आहे.

मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टमध्ये अन्य दोन प्रकल्पांचाही समावेश आहे. ज्यामध्ये शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गावर उन्नत रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पनवेल ते वसई या दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वेमार्ग सुरू करण्यात येणार आहे. या सगळ्या कामासाठी मिळून अंदाजे ३४,९२६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

BJP च्या दोन आमदारांचे कमलनाथ सरकारच्या बाजूनं मतदान

ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक होते आहे. त्यापूर्वी या सर्व प्रकल्पांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. राज्याने मंजुरी दिल्यावर तो रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. रेल्वे मंत्रालयाकडून हा संपूर्ण प्रकल्प मंजुरीसाठी निती आयोगाकडे पाठविला जाईल. त्यानंतरच केंद्रीय मंत्रिमंडळ त्याला मंजुरी देईल. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यावर कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल.