पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिपक भोईर हत्या प्रकरण: धुळ्यातून ४ आणि उल्हासनगरमधून दोघांना अटक

उल्हासनगर हत्या प्रकरण

उल्हासनगरमध्ये पूर्ववैमनस्यातून दिपक भोईर या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सहा जणांच्या टोळीने सोमवारी मध्यरात्री पाठलाग करत दिपकवर चाकूने वार करत त्याची हत्या केली होती. याप्रकरणातील सहाही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आले आहे. चार आरोपींना धुळ्यातून तर दोन आरोपींना उल्हासनगर येथून पोलिसांनी अटक केली आहे.  

 

मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

याप्रकरणातील आरोपी धुळ्याच्या दिशेने फरार झाल्याची माहिती मिळताच पोलिसाच्या पथकाने त्यांच्या पाठलाग करत त्यांना अटक केली. नरेश उर्फ बबल्या चव्हाण (३१ वर्ष), राजु कनोजिया (२५ वर्ष), योगेश लाड (१९ वर्ष), अनिकेत शिरसाठ (१९ वर्ष) यांना धुळे पोलिसांच्या मदतीने अटक केली. तर राहुल कनोजिया (२३ वर्ष) आणि विशाल भिवसाने (२० वर्ष) याला उल्हासनगर येथूनच अटक केली आहे. घटनेच्या २४ तासांच्या आत आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

'जितना उसके सिर पर बाल नहीं उतना मेरे पास माल है'

पूर्ववैमनस्यातून दीपक भोईरची हत्या करण्यात आली असल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यापूर्वी नरेश उर्फ बबल्या चव्हाण याच्या भावाला मृतक दिपक भोईर याने मारहाण केली होती. याचाच बदला घेण्यासाठी बबल्याने अनिकेत, राजु आणि योगेश या मित्रांच्या मदतीने दिपक भोईर याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दिपक भोईर गंभीर जखमी झाला. उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 

... आणि इंडिगोच्या त्या विमानाला इमर्जन्सी मोडवर मुंबईत परतावे