महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. मातोश्रीवरुन बाहेर पडल्यानंतर मंत्रालयात दाखल होण्यापूर्वी त्यांनी हुतात्मा स्मारक चौकात हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी शिवसेना आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी त्यांच्यासोबत होते.
मंत्रालयात नवीन 'नेमप्लेट', मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
ठाकरे घराण्यातील पहिल्या मुख्यमंत्र्याचे स्वागत करण्यासाठी मंत्रालयात खास सजावट करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने नव्या मुख्यमंत्र्यांची स्वागत केले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि जयंत पाटील हे उद्धव ठाकरेंपूर्वीच मंत्रालयात दाखल झाले होते. मंत्रालयात आपल्या कामासाठी आलेल्या सामान्य जनतेमध्येही नव्या मुख्यमंत्र्यांना पाहण्याची उत्सुकता पाहायला मिळाली. मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुख्यसचिवांसह अन्य अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक अपेक्षित आहे.
फडणवीसांचा आक्रमक पवित्रा,महाविकास आघाडीवर केली प्रश्नांची सरबत्ती
Mumbai: Shiv Sena Chief Uddhav Thackeray takes charge as Maharashtra Chief Minister. pic.twitter.com/Q5D4AcoLOf
— ANI (@ANI) November 29, 2019