पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा दावा कायम - उध्दव ठाकरे

उद्धव ठाकरे

राज्यामध्ये सत्तास्थापनेचा तिढा न सुटल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राज्यापालांनी शिवसेनाला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते पण काँग्रेस- राष्ट्रवादीचा पाठिंबा न मिळाल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. तरी सुध्दा 'शिवसेनाचा सरकार स्थापनेचा दावा आजही कायम आहे', असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. हॉटेल रिट्रीटवर जाऊन उद्धव ठाकरे यांनी आमदारांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर टीका केली. 'सरकार स्थापनेसाठी राज्यपालांना आम्ही फक्त ४८ तासांची मुदत मागितली होती. मात्र दयाळू राज्यपालांनी आम्हाला सहा महिन्याची मुदत दिली', असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, राष्ट्रपतींची स्वाक्षरी

भाजपने शिवसेनेवर काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलायला वेळ आहे. मात्र भाजपशी बोलायला वेळ नाही असा आरोप केला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. 'काल पहिल्यांदा शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला अधिकृतरित्या संपर्क केला, असे त्यांनी यावेळी सांगितले. सरकार स्थापन करणे हा विनोद नाही. शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असताना सुध्दा राज्यपालांनी सरकार स्थापनेच्या दाव्यासाठी कमी वेळ दिला असल्याचे त्यांनी सांगितले. 

आमचं अजून ठरलेलं नाही, आघाडीने मांडली भूमिका

दरम्यान, 'ज्याप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीला स्पष्टता हवी. तशी शिवसेनेला सुध्दा स्पष्टता हवी आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस काही मुद्द्यांवर चर्चा करतील. त्यांच्या निर्णयानंतर आम्ही एकत्र बसू चर्चा करु. त्यानंतर आम्ही आमचा दावा पुढे नेऊ, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तसंच आमच्यामध्ये जे काही ठरेल हे जगजाहीर असेल. आम्ही लपून-छपून काही करणार नाही असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसंच भाजपने दिलेला शब्द न पाळल्यामुळे एकत्र येण्यात अडचणी आल्या असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. 

राज्यपाल भाजपचे बाहुले आहेत का?: सचिन सावंत