दादरच्या शिवसेना भवन येथे शिवसेच्या सर्व नवनिर्वाचित आमदार आणि खासदारांची महत्वाची बैठक पार पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना ओला दुष्काळामुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत करा, असे आदेश दिले आहेत. तसंच मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
नोटाबंदीला तीन वर्षे पूर्ण झाल्यावर आता राहुल गांधी म्हणतात...
राज्यातील शेतकरी संकटात असून या शेतकऱ्यांसाठी शिवसेना भवनामध्ये बैठक झाली. 'राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहचवण्याच्या कामाला लागा. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात मदतकेंद्र उभं करा. शासनाची मदत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचवा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी या बैठकीl दिले आहेत.
आम्ही आमच्या आमदारांना कुठेही हलवले नाही: विजय वडेट्टीवार
दरम्यान, शिवसेना मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर ठाम आहे. उद्धव ठाकरे हे देखील मुख्यमंत्री पदावर ठाम असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे त्यांनी पुन्हा सांगितले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीतील सत्ता स्थापनेचा तिढा आणखी वाढला असल्याचे पहायला मिळत आहे.
कोणाच्या मध्यस्थीची शिवसेनेला गरज नाही, संजय राऊत यांचे वक्तव्य