पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस नेत्यांसोबत योग्य दिशेने चर्चा सुरु: उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

'काँग्रेस नेत्यांसोबत योग्य दिशेने चर्चा सुरु आहे. चर्चा पूर्ण झाल्यानंतर जो काही निर्णय होईल तो योग्यवेळी सर्वांना कळेल.', अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर दिली आहे. मुंबईतील हॉटेल ट्रायडंटवर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे उपस्थित होते. तब्बल तब्बल पाऊण तास या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली.

'मातोश्री' बाहेरील सेनेच्या मुख्यमंत्रिपदाचे बॅनर्स पालिकेने हटवले

राज्यामध्ये सत्तास्थापानेचा तिढा सुटत नसल्यामुळे  मंगळवारी राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा निर्धार करत शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी सुरु केलेले प्रयत्न सुरुच आहेत. याचसंदर्भात आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे नेते विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. काँग्रेससोबत सकारात्क चर्चा सुरु असल्याचे संकेत यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले. 

'उद्धव ठाकरेंची भेट हीच एक सकारात्मक गोष्ट'

दरम्यान, शिवसेनेसोबत चर्चा सुरु होणे हीच एक सकारात्मकता आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. 'ही एक सदिच्छा भेट होती. आम्ही सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादी पुढे कसे जायचे यावर निर्णय घेतील. त्यानंतर शिवसेनेसोबत एकत्रित चर्चा करु. बोलणी झाल्यानंतर पुढे जायचे ठरवू, असे बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

पुढचं पाऊल, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून समन्वय समितीची स्थापना