पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देव सर्वांचा आहे, देव दर्शनात राजकारण नको: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

'देव सर्वांचा आहे त्यामुळे देव दर्शनात कोणतेही राजकारण आणू नका. देवाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. ज्याला कोणाला अयोध्येला यायचे आहे त्यांनी यावे, असे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. ७ मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहे यावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

पक्षापेक्षा राष्ट्रहित मोठे - नरेंद्र मोदी

सरकारला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी सामनाच्या संपादक पदाची जबाबदारी रश्मी ठाकरे यांच्याकडे दिल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी असे सांगितले की, 'शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाची दिशा आणि भाषा बदलणार नाही. सामनाची भाषा ही आमची पितृभाषा आहे. रश्मी ठाकरे या जरी सामनाच्या संपादक झाल्या असल्या तरी सामना संपादकीय विभागाची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडेच राहणार आहे.'

संसदेच्या प्रवेशद्वारावर भाजप खासदाराची गाडी बूम बॅरिअरला धडकली

यावेळी मुस्लिम आरक्षणाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'मुस्लिम आरक्षणाचा विषय अद्याप अधिकृतपणे माझ्यापर्यंत आलेला नाही. आम्ही याबाबतची भूमिका अद्याप निश्चित केली नाही. जेव्हा हा विषय चर्चेला येईल तेव्हा विरोधकांनी टीका करावी. त्यांनी आपली ऊर्जा राखून ठेवावी, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. तसंच, मराठा आरक्षणावर सरकार ताकदीने लढत आहे, असे देखील त्यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस यांना झटका, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली