पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फडणवीस सरकारचे अनेक निर्णय ठाकरे सरकारच्या स्कॅनरखाली, काहींना तूर्त स्थगिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील गत देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांचा फेरआढावा घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. तशा स्वरुपाच्या सूचना नगर विकास विभागाला देण्यात आल्या आहेत. विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या आधी फडणवीस सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांना तूर्त स्थगित करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यातील पाच जलसिंचन प्रकल्पांच्या खर्चात ६१४४ कोटी रुपयांची वाढ करण्याला देवेंद्र फडणवीस सरकारने मंजुरी दिली होती. पण यामध्येही लक्ष घालण्याचे सध्याच्या सरकारने ठरविले आहे.

हैदराबाद बलात्कार : जिथे ते पाशवी कृत्य केले तिथेच सर्व मारले गेले...

भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या नेत्यांकडून चालविण्यात येणाऱ्या चार साखर कारखान्यांच्या कर्जाला हमी देण्याचा निर्णय गेल्या सरकारने घेतला होता. त्या निर्णयाला आता उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. गेल्या सरकारने सार्वजनिक बांधकामाची जी कामे सुरू केली होती. ती तूर्त थांबविण्याचे आदेशही नगर विकास विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत या कामांना कोणताही निधी दिला जाऊ नये, असे आदेश नगर विकास विभागाने सर्व महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींना दिले आहेत. गेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच नगर विकास विभाग होता.

गेल्या सरकारने शेवटच्या सहा महिन्यांमध्ये जे निर्णय घेतले होते. त्या सर्व निर्णयांचा फेरआढावा उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतला जातो आहे. ९ सप्टेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत जे ३४ निर्णय घेतले होते. त्या सर्व निर्णयांचा फेरआढावा घेतला जातो आहे.

HTLS 2019 : पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सवर आमचा भर - नरेंद्र मोदी

आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्कालिन फडणवीस सरकारने वाघूर, ऊर्ध्व तापी, वरणगाव, शेळगाव आणि भातसा या चार जलसिंचन प्रकल्पांच्या खर्चातील वाढीला मंजुरी दिली होती. या पैकी चार प्रकल्प हे एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे याच जिल्ह्यातून येतात. कोणत्या आधारावर या प्रकल्पांच्या खर्चात वाढ दाखविण्यात आली आहे. हे समजून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी एक बैठकही बोलावली आहे.