पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रपती राजवटीला घाबरण्याचे कारण नाही, उद्धव ठाकरेंकडून आमदारांना धीर

उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालाडमधील हॉटेल रिट्रिटमध्ये जाऊन तिथे असलेल्या शिवसेना आमदारांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आमदारांना राष्ट्रपती राजवटीला घाबरण्याचे अजिबात कारण नसल्याचे सांगितल्याचे समजते. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते या बैठकीसाठी उपस्थित होते. 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, राष्ट्रपतींची स्वाक्षरी

आमदारांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही स्थितीत धीर सोडू नका, असे आमदारांना सांगितल्याचे समजते. बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणारे अरविंद सावंत यांचे उद्धव ठाकरे यांनी कौतुकही केले. आपण लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

राज्यपाल भाजपचे बाहुले आहेत का?: सचिन सावंत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिफारशीनंतर मंगळवारी संध्याकाळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राज्यात कोणताही पक्ष सत्ता स्थापन करू शकत नसल्याचा अहवाल राज्यपालांनी केंद्र सरकारकडे पाठविल्यानंतर लगेचच मंगळवारी तात्काळ प्रभावाने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.