पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरेंकडून ठाण्याच्या महापौर आणि उपमहापौरांचा सत्कार

नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम

कोल्हापूर महापालिकेत झालेला महाशिवाघाडीचा पॅटर्न ठाणे महापालिकेत देखील पाहायला मिळाला. ठाण्यामध्ये  महापौर पदी शिवसेनेचे नरेश म्हस्के तर उपमहापौर पदी पल्लवी कदम विराजमान झाले आहेत. दोघांची देखील बिनविरोध निवड झाली आहे. ठाण्याचे नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर दोघांचा देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहे. 

शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेला काँग्रेस कार्यकारिणीकडून हिरवा कंदील

महापौर पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना शिवसेनेच्याविरोधात कोणत्याही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांची बिनविरोध निवड झाली. ठाणे महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाची निवड झाली. ठाणे महानगरपालिकेवर पुन्हा शिवसेनेची सत्ता आली आहे. ठाणे महापालिकेला फुलांची सजावट करण्यात आली आहे. 

'शिवसेनेच्या नादाला लागून महाराष्ट्रातील काँग्रेसही संपेल'

उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दोघांचा सत्कार केला. महापौर आणि उपमहापौर यांची भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे. दरम्यान, महापौर पदी विराजमान झालेले नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्ती समजले जातात. शिवसेनेने ठाणे महापालिकेतील आपली सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळविले असून याचे संपूर्ण श्रेय एकनाथ शिंदे यांना जात असल्याचे सांगितले जात आहे.

Pink Ball Test : ईडन गार्डनवर वाहतेय गुलाबी हवा...