पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खातेवाटप : अजित पवारांकडे अर्थ, आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण

शरद पवार आणि उद्धव ठाकरे (PTI PHOTO.)

अखेर सहा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप जाहीर झाले आहे. या खातेवाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे महत्त्वाची खाती गेली आहेत. खुद्द उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे केवळ सामान्य प्रशासन खाते ठेवले आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन आणि पर्यावरण ही खाती देण्यात आली आहेत. खातेवाटपास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे.

असे आहे खातेवाटप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विषय/खाती

 

शिवसेना
एकनाथ शिंदे - नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
सुभाष देसाई - उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा
उदय सामंत - उच्च व तंत्र शिक्षण
आदित्य ठाकरे - पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार
अनिल परब- परिवहन, संसदीय कार्य
शंकरराव गडाख - मृद व जलसंधारण
संदिपान भुमरे - रोजगार हमी, फलोत्पादन
गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता
दादा भुसे - कृषि, माजी सैनिक कल्याण
संजय राठोड - वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
शंभूराजे देसाई - गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन (राज्यमंत्री)
अब्दुल सत्तार - महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार, जमिनी विकास, विशेष सहाय्य (राज्यमंत्री)

राष्ट्रवादी

उपमुख्यमंत्री अजित पवार - वित्त, नियोजन
जयंत पाटील - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
अनिल देशमुख - गृहमंत्री
छगन भुजबळ - अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीप वळसे पाटील - राज्य उत्पादन शुल्क, कामगार
नवाब मलिक- अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता
बाळासाहेब पाटील - सहकार, पणन
राजेश टोपे- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण
धनंजय मुंडे - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन
हसन मुश्रीफ - ग्रामविकास
दत्ता भरणे - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय, सामान्य प्रशासन (राज्यमंत्री)
अदिती तटकरे - उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क (राज्यमंत्री)
संजय बनसोडे - पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्यमंत्री (राज्यमंत्री)
प्राजक्त तनपुरे - नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन (राज्यमंत्री)

काँग्रेस

बाळासाहेब थोरात - महसूल
अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
नितीन राऊत - ऊर्जा
विजय वड्डेटीवार - ओबीसी, खार जमिनी, मदत आणि पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण
के.सी.पाडवी - आदिवासी विकास
यशोमती ठाकूर - महिला व बालकल्याण
अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक
सुनील केदार - दुग्धविकास व पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण
वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण
अस्लम शेख - वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास
सतेज पाटील - गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण (राज्यमंत्री)
विश्वजित कदम - कृषी आणि सहकार (राज्यमंत्री)

बच्चू कडू - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार (राज्यमंत्री)
राजेंद्र यड्रावकर- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग सांस्कृतिक (राज्यमंत्री)