पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून शिक्षकांचा उडी मारण्याचा प्रयत्न

शिक्षकांचा उडी मारण्याचा प्रयत्न

मंत्रालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन शिक्षकांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. हेमंत पाटील आणि अरुण नेतोरे अशी या शिक्षकांची नावे असल्याचं समजत आहे. सुदैवानं मंत्रायलपरिसरात जाळ्या लावण्यात आल्यानं ते दोघंही सुखरुप आहेत. 

पुणे-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत होण्याचा नवा विक्रम

अनेकदा मंत्रालयात  आपल्या मागण्या घेऊन आलेल्या व्यक्तींनी नैराश्यातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणताही अनूचित प्रकार घडून नये यासाठी संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. ३०० विनाअनुदानित शाळांना मान्यता देण्यासाठी शिक्षकांच एक शिष्टमंडळ मंत्रालयात भेटीसाठी आलं होतं. मात्र मंत्र्यांची भेटच झाली नसल्यानं दोन शिक्षकांनी मंत्रालयाच्या इमारतीमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीडमधील ५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

एका संकेतस्थळाच्या माहितीनुसार ते दोघंही सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अपंग शाळेतले शिक्षक आहेत.