पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत सामूहिक बलात्कार करुन तरुणीची हत्या, दोघांना अटक

पतीच्या समोरच या नराधमांनी पीडितेवर सामुहिक बलात्कार

मुंबईमध्ये सामूहिक बलात्कार करुन तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ठाण्यातून अटक केली आहे. मुंबईच्या सांताक्रुझ परिसरात मंगळवारी रात्री ही घटना घडली होती. तरुणीच्या शेजारीच राहणाऱ्या दोन तरुणांनी हे कृत्य केले होते. याप्रकरणामुळे सांताक्रुझ परिसर हादरला होता.

वांद्र्यातील घुसखोरांचे मोहल्ले आधी साफ करा, मनसेची पोस्टरबाजी

सांताक्रुझ परिसरात मृत तरुणी कुटुंबियांसोबत राहत होती. तिच्या शेजारच्या घरामध्ये तीन तरुण राहत होते. तरुणी त्यांच्याशी बोलायची. मंगळवारी संध्याकाळी दोन तरुणांनी तिला घरी बोलवले. ओळख असल्यामुळे तरुणी त्यांच्या घरी गेली. दरम्यान, दोन्ही आरोपींनी घराला कडी लावून तरुणीला मारहाण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर उशीने तोंड दाबून तिची हत्या केली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. 

राहुल गांधींच्या प्रश्नावरील उत्तरावरून लोकसभेत गदारोळ

दरम्यान, आरोपींसोबत राहणारा तिसरा तरुण रात्री उशिरा घरी आला. त्याने घराचा दरवाजा खोलला असता तरुणीचा मृतदेह घरामध्ये दिसला. त्यांनी ताबडतोब पोलिसांना फोन करुन बोलावून घेतले. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरु आहे. 

निर्भया प्रकरणात आता सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी