पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक: उल्हासनगरमध्ये दोन नवजात अर्भकांना फेकले

नवजात अर्भकांचा मृतदेह सापडला

उल्हासनगरमध्ये दोन अर्भक फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दिवसाचे दोन स्त्री जातीचे अर्भक फेकून देण्यात आले होते. दोन्ही अर्भक मृतावस्थेत सापडले आहेत. एक अर्भक संजय गांधीनगर येथील रेल्वे ट्रॅकजवळ फेकण्यात आले होते. तर दुसरे अर्भक गोल मैदान येथे फेकण्यात आले होते. 

मनसे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचे सूचक ट्विट

या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही अर्भकांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उल्हासनगर पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे. 

मायावतींनी HM अमित शहांचे चॅलेंज स्वीकारलं