पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाबाधित रुग्णांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा, फक्त...

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या आणि सरकारी रुग्णालयात विलगीकरण कक्षात राहण्यास उत्सुक नसलेल्या मुंबईतील नागरिकांसाठी आता दोन पंचतारांकित रुग्णालयात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी मुंबई महापालिकेने दोन पंचतारांकित रुग्णालयांशी करार केला आहे. महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी सोमवारी ही माहिती दिली.

कोरोनामुळे मुंबईत एका वयोवृद्ध रुग्णाचा मृत्यू

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या हॉटेल मिराज आणि आयटीसी मराठा या दोन हॉटेलशी करार करण्यात आला आहे. ज्या रुग्णांना विलगीकरण पद्धतीने राहण्यास सांगितले आहे. ते या हॉटेलमध्ये राहू शकतात. फक्त त्यांना त्यासाठी ठराविक शुल्क हॉटेलला द्यावे लागेल. संबंधित हॉटेलचे जे भाडे आहे. त्यापेक्षा कमी शुल्कात रुग्णांना या हॉटेलमधील रूम उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी सध्या हॉटेल व्यवस्थापनाशी वाटाघाटी करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

या दोन्ही हॉटेलमध्ये जेवढ्या खोल्या उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे तिथे उपलब्धता करून दिली जाईल. मुंबईत सुमारे १००० बेड्सची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. यासाठी अन्य काही हॉटेल्सशी चर्चा सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीची मानवावर चाचणी घेण्यास अमेरिकेत सुरुवात

सध्या मुंबईत ६२१ नागरिकांना आपल्या घरातच स्व-विलगीकरण पद्धतीने राहण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती राज्य सरकारकडून मिळाली आहे.