पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरमध्ये एमटीडीसीचे दोन रिसॉर्ट होणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मंत्रालय

जम्मू-काश्मीरमध्ये एमटीडीसीचे दोन रिसॉर्ट होणार आहे. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या पेहलगाम आणि लडाख येथे एमटीडीसीचे रिसॉर्ट उभारण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये रिसॉर्ट उभारण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.

शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना रोहित पवार यांचे सडेतोड उत्तर

यासंबंधिचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारला आणि जम्मू-काश्मीरमधील राज्यपालांना पाठविण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये मालमत्ता विकत घेऊन हे रिसॉर्ट उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून जम्मू काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये थ्री आणि फोर स्टार सोयीसुविधा असलेले रिसॉर्ट उभारण्यात येणार आहे. तसंच १५ दिवसांमध्ये जागेची पाहणी करण्यात येणार असल्याचे जयकुमार रावल यांनी सांगितले. 

ओएनजीसी प्लँट आगीमुळे मुंबईतीस गॅस पुरवठ्यावर परिणाम

जम्मू काश्मीरमध्ये रिसॉर्ट उभारण्याच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या या योजनेला चालना मिळाली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एमटीडीसीचे दोन रिसॉर्ट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रिसॉर्टमुळे जम्मू-काश्मीरमधील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. त्याचसोबत पर्यटनामुळे अर्थव्यवस्था आणि काश्मीरच्या विकासालाही चालना मिळेल, असे रावल यांनी सांगितले.

डॉक्टरांवर हल्ला केल्यास १० वर्षे शिक्षा, केंद्राकडून मसुदा तयार