पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यानंतर मुंबईत आढळले कोरोनाचे दोन रुग्ण, राज्यातील आकडा ७ वर

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. (संग्रहित छायाचित्र)

राज्यातील कोरोना विषाणूची लागण झालेले आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या दोघांच्या चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या असून राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा ७ वर पोहचला आहे. राज्यात दुबईहून परतलेल्या पुण्यातील कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याच कुटुंबियांच्या विमानातून मुंबईत आढळलेल्या रुग्णांनी प्रवास केला होता. या रुग्णांवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.   

कोरोना बाधितांची ओळख उघड करु नका, प्रशासनाची पुन्हा विनंती

कोरोना व्हायरसची राज्यातील पहिली केस ही पुण्यात आढळली होती. दुबईहून परतलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी समोर आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या दाम्पत्याच्या मुलीसह त्यांनी मुंबई विमानतळावरुन पुण्याला ज्या टॅक्सीतून प्रवास केला त्या टॅक्सी चालकाला आणि त्यांच्या विमानातील आणखी एका सह प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील दोन रुग्णांचे रिपोर्टस हे पॉझिटिव्ह आले आहेत.   

पुणे : कोरोनाबाधित कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या ४० जणांचा शोध सुरु

पुण्यातील दाम्पत्य आणि त्यांच्या सहवासातील दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्या सानिध्यात आलेल्या लोकांचा प्रशासनाकडून शोध सुरु आहे. त्यांच्यासोबतील सह प्रवाशांपैकी सहा जणांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली. आतापर्यंत राज्यात जे रुग्ण सापडले आहेत त्यांनी एकाच विमानातून प्रवास केला होता. या विमानातून जवळपास ४० जणांनी प्रवास केला होता. त्याच विमानातील आणखी दोन केसेस समोर आल्यानंत हा आकडा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Two more Coronavirus positive cases in Mumbai state health department confirmed 7 corona positive cases in the Maharashtra