पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा ९ वर; दोन नव्या रुग्णात वाढ

कोरोना विषाणू चाचणी (संग्रहित छायाचित्र)

मुंबईतील सर्वात मोठी लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. याठिकाणी दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. बुधवारी धारावीत आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा ९ वर पोहचला आहे. धारावी झोपडपट्टीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालल्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. 

जागतिक आरोग्य संघटना पक्षपाती, डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, धारावीमध्ये आणखी दोन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. मुकुंदनगर आणि धनवाडा चाळीमध्ये राहणाऱ्या दोन तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा १०१८ वर पोहचला आहे. तर ६४ कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांची नमती भूमिका, भारताच्या भूमिकेला पाठिंबा

धारावी झोपडपट्टीमध्ये १५ लाख लोकं राहतात. याठिकाणी सापडलेल्या पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारा दरम्यान सायन रुग्णालयात मृत्यू झाला होता. धारावी झोपडपट्टीतील डॉ. बलीगा नगर, वैभव अपार्टमेंट, मुकुंद नगर आणि मदीना नगर या चार भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. हे परिसर सील करण्यात आले आहेत. या परिसरात महापालिकेकडून सतत औषध फवारणी केली जात आहे. 

पुण्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू; मृतांचा आकडा १० वर