पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईः दोन टँकरच्या धडकेत रस्त्याच्या कडेला झोपलेले दोघे ठार

विक्रोळी येथील अपघातस्थळ (ANI)

दोन टॅंकरची धडक झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या तिघांना चिरडले गेल्याची धक्कादायक घटना विक्रोळी पार्क साईट येथील कैलास कॉम्पलेक्स परिसरात घडली आहे. या दुर्घटनेमध्ये दोघे ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघेही एकाच कुटुंबातील असल्याचे बोलले जात आहे.

गोवा विमानळावर मिग २९ के विमानाचा ड्रॉप टँक कोसळून आग

व्यावसायिक वाहने चालविण्यासाठी लवकरच कमाल वयोमर्यादा

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी पश्चिम येथील पवई रोड नव्वद फुट रोडवर रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या टँकर खाली दोन महिला आणि एक लहान मुलगा असे तीन जण झोपले होते. या महिला मजुरीचे काम करतात. रात्री सव्वा नऊच्या सुमारास त्या टँकरच्या मागे आणखी एक टँकर पार्क केला जात होता. टँकर पार्क करत असताना चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि त्याने समोरील टँकरला धडक दिली. उतार असल्याने पार्क केलेले टँकर पुढे जाऊ लागले आणि यात त्या टँकर खाली झोपलेले तिघे जण चिरडले गेले. तिघांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी दोन्ही महिलांचा मृत्यू झाला तर लहान मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर टँकर चालक फरार झाल्याचे समजते. या प्रकरणी पार्क साईट पोलीस अधिक तपास करत आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Two dead and one injured after an oil tanker ran over them while they were sleeping Vikhroli Mumbai