पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पालघरमध्ये 13 कोटींचा शस्त्रसाठा आणि अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

पालघर पोलिस

पालघर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ आणि शस्त्रसाठा विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना सापळा रचत पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील हिंदुस्थान धाबा परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरु असून मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

नुसती युती नव्हे महायुती! पण.. फॉर्म्युला अद्यापही गुलदस्त्यातच

मिळालेल्या माहितीनुसार, मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजे चिल्हार फाटा येथील हिंदुस्थान ढाबा परिसरात काही व्यक्ती अंमली पदार्थ आणि शस्त्रसाठा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. यावेळी दोन जण प्लास्टिकची वजनदार गोणी घेऊन येताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्या गोणीमध्ये अंमली पदार्थ आणि शस्त्रसाठा असल्याचे समोर आले. 

गुजरातमध्ये भाविकांची बस दरीत कोसळली; २१ जणांचा मृत्यू

आरोपींनी आणलेला शस्त्रसाठा आणि अंमली पदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये 4 गावठी पिस्तुल, 3 एके-47, 63 जिवंत काडतुसे, 8 किलो 900 ग्रॅम वजनाची इफ्रेडीन नावाची अंमली पदार्थाची पावडर, 8 किलो 500 ग्रॅम डीएमटी पावडर, 500 ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगर, 3 किलो 900 ग्रॅम वजनाची डोडो पावडर, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 13 कोटी 60 लाख 99 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

धक्कादायक! अल्पवयीन बलात्कार पीडितेने दिला बाळाला जन्म

दरम्यान, आरोपींविरोधात मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. हा शस्त्रसाठा कुठून, कोणासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरुन आणण्यात आला होता याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. या तपासातून मोठा उलघडा होण्याची शक्यता आहे. 

सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करु: अजित पवार