पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: मुंबईतील डोंगरी मार्केटमधून कांदा चोरी; दोघांना अटक

कांदा

कांद्याच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. दिवसेंदिवस कांद्याच्या किंमतीत होणाऱ्या वाढीमुळे सर्व सामान्य जनतेच्या डोळ्यात पाणी येत आहे. अशामध्ये कांदा चोरीच्या घटना देखील समोर येत आहेत. मुंबईतल्या डोंगरी भाजी मार्केटमधून १६८ किलो कांदा चोरीला गेला होता. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत; मोदी सरकारची अग्निपरिक्षा

डोंगरीतल्या नवरोजी हिल रोडवरील भाजी मार्केटमध्ये अकबर शेख यांचे कांदा बटाट्याचे दुकान आहे. अकबर शेख यांच्या दुकानातील १२२ किलो कांद्याच्या २२ गोण्या ५ डिसेंबर रोजी रात्री चोरीला गेल्या होत्या. सोमवारी सकाळी त्यांनी दुकान उघडले असता ही बाब त्यांच्या लक्षात आली. दरम्यान, त्यांच्याच दुकाना शेजारी असलेल्या दुसऱ्या एका कांदा विक्रेत्याचा ५६ किलो कांदा असलेली गोणी देखील चोरीला गेली होती.

अमेरिकेतील न्यू जर्सीत गोळीबार; पोलिस अधिकाऱ्यासह ६ जण ठार

सध्या १२० रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे. अशामध्ये १५८ किलो म्हणजे २१ हजार १६० रुपयांचा कांदा चोरीला गेला होता. अकबर शेख यांनी कांदा चोरी प्रकरणी डोंगरी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांना दोघांना अटक करण्यात यश आले आहे.

माजी CM फडणवीसांना शिवसेनेकडून ही अपेक्षा