पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बलात्काराच्या आरोपात टीव्ही अभिनेत्याला पोलीस कोठडी

टीव्ही अभिनेता करण ओबेरॉय

टीव्ही अभिनेता करण ओबेरॉय याला बलात्काराच्या आरोपा प्रकरणी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  सोमवारी मुंबई न्यायालयाने त्याला ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. करण ओबेरॉयवर एका महिला ज्योतिषीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संबंधित पीडितेने ओशिवारा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.  

पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, डेटिंग अ‍ॅप्लिकेशनद्वारे दोघांची ओळख झाली. ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाल्यानंतर संशयित आरोपीने महिलेला लग्नाचे वचन दिले. त्याने पीडितेला आपल्या घरी बोलवले. घरी गेल्यानंतर नारळ पाण्यातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. आरोपीने या घटनेचा व्हिडिओ बनवून पैसे उकळल्याचा आरोप पीडितेने केला आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:TV Actor Karan Oberoi who was arrested an alleged rape case has been sent to police custody